ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शरद शतम्' योजनेचा प्रस्ताव

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शरद शतम्' योजनेचा प्रस्ताव

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ज्येष्ठ नागरिकांसाठी For senior citizens आरोग्य तपासणी आणि उपाय योजनांच्या health check-ups and remedial plans दृष्टीने 'शरद शतम्' नावाची योजना 'Sharad Shatam' Yojana प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यासाठी तीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्च स्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Social Justice Minister Dhananjay Mundeयांनी शुक्रवारी दिली.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार आहेत. लवकरच या योजनेची मान्यता आगामी मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे 'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त World Senior Citizens' Day आयोजित 'समृद्ध वृद्धापकाळ' या चर्चा सत्राच्या उदघाटन कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.आजाराचे वेळीच निदान व्हावे आणि त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात. त्या तपासण्या मोफत असाव्यात या उद्देशाने 'शरद शतम्' ही योजना खूप महत्वाची आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

या योजनेची कार्यपद्धती,सर्वेक्षण या सर्व बाबींबरोबरच आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केले जावेत यासाठीचे समन्वयन या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लान तयार करण्यासाठी आरोग्यसह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती नुकतीच गठीत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

'समृद्ध वृद्धापकाळ' या विषयावर आयोजित चर्चासत्रात हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकर, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related Stories

No stories found.