सावधान ! सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना 60 लाखांना गंडा

अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांचीही फसवणूक
सावधान ! सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना 60 लाखांना गंडा

पुणे - सैन्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने 15 ते 20 तरूणांना तब्बल 50 ते 60 लाख रूपयांचा गंडा घातला आहे. आणखी काही फसवणुकीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. योगेश दत्तू गायकवाड (रा. किशोरे, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका तरूणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी तरूणी मूळची आळंदी (देवाची) येथे राहत असून जानेवारी 2020 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका रूग्णालयात आली होती. त्यावेळी परिसरातील स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड त्याच्या पँटच्या खिशातून पडलेले तरुणीने पाहिले. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले.

त्यानंतर त्याने फिर्यादी तरूणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरूणीच्या आईचा विश्‍वास संपादित केला. त्यानंतर तरूणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी 2 लाख रूपये घेतले. त्यानंतर तरूणीच्या गावातील व बाहेरील गावातील तरूणांचा विश्‍वास संपादित करून योगेशने आतापर्यंत 50 ते 60 लाखांची फसवणूक केली आहे.

आरोपी योगेश मूळचा कन्नड तालुक्यातील असून पुण्यातील विविध भागात तो फिरत होता. बसस्थानकावर एकट्या तरूणींना गाठून विश्‍वास वाढवून मोबाईल नंबर घेत होता. त्यानंतर तरूणीसोंबत खोटे लग्न करून त्यांच्या कुटूंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने 2 ते 3 लाख रूपये घेउन पोबरा करीत होता. अशाच प्रकार त्याने फिर्यादी तरूणीसोबत केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी सांगितले, शहरातील विविध भागात फिरून आरोपीने तरूणींना जाळ्यात अडविले आहे. मोबाईल नंबर, व्हॉटसअ‍ॅपद्वारे चॅटिंग करून विश्‍वास वाढवून फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्याने 15 ते 17 तरूणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सावधान ! सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना 60 लाखांना गंडा
करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट लसीकरणाचे संरक्षण झुगारून देऊ शकतो - एम्स प्रमुख

अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांचीही फसवणूक

आरोपीविरुद्ध अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा 2019 मध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यावेळी आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील डोंगरगाव येथील असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

2019 मध्ये या प्रकरणी गणेश संभाजी कराळे (वय 22, राहाणार - आगडगाव, तालुका - नगर) या तरूणाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत कराळे यांनी म्हटले आहे, आरोपी योगेश गायकवाडने कराळे यांना लष्करात भरती करून नोकरी लावून देतो असे सांगून 3 लाख रूपयांची मागणी केली. त्या नुसार कराळे यांनी नगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून गायकवाड याने दिलेल्या अकाऊंटमध्ये 3 लाख रूपये जमा केले होते.गायकवाडने अशाच प्रकारे 8 जणांची फसवणुक केली असल्याचे ही कराळे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. गावातील आणखी आठ तरुणांकडून आरोपीने लाखो रुपये घेतले होते. परंतु, एकालाही नोकरीला लावले नाही. पैसे घेऊन फसवणूक केल्याचे कराळे याच्या लक्षात आले. त्यानंतर तोफखाना पोलिस स्टेशनला योगेश गायकवाड याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सावधान ! सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना 60 लाखांना गंडा
श्रीरामपूरची शिवानी छल्लारे छोट्या पडद्यावरील मालिकेत
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com