''ही शान कोणाची, लालबागच्या राजाची''; पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप

''ही शान कोणाची, लालबागच्या राजाची''; पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप

मुंबई | Mumbai

दहा दिवस कसे गेले कळलेच नाही अखेर निरोप देण्याची ती वेळ जवळ आली (Ganeshotsav 2023) आणि प्रत्येकचे मन गहिवरुन आले. बाप्पाला समुद्रात घेऊन जातानाचे शेवटचे काही क्षण आणि डोळ्याच्या कडाही तेवढ्याच पाणावलेल्या होत्या. “ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची (Lalbaugcha Raja) अशा निनादात काल (२८ सप्टेंबर) सकाळी १० वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचे अखेर २३ तासांनी विसर्जन झाले (Immersion Of Lalbaugcha Raja) आहे.

गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती. संपूर्ण लालबाग ते गिरगाव चौपाटीचा परिसर भक्ती आणि शक्तीने, उत्सव आणि उत्साहाने फुलून गेला होता. बघावे तिथे गर्दीच गर्दी दिसत होती. भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. गिरगाव चौपाटीवर आपल्या लाडक्या राजाला निरोप देताना कुणाचे ऊर भरून आले होते, तर कुणाचा कंठ दाटून आला होता. पुढच्या वर्षी लवकर या… असे सांगताना अनेकांना भरून आले होते.

''ही शान कोणाची, लालबागच्या राजाची''; पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप
अ‍ॅट्रॉसिटी प्रकरण : खंडेराव देवस्थान ट्रस्टींसह १२ जणांना दिलासा; हायकोर्टाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण

दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाहेर पडले. बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पावसानेही काल हजेरी लावली. पावसाच्या आगमनातही बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते. गेल्या २३ तासांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीतील उत्साह कमी झाला नव्हता.

जेव्हा बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा बाप्पाला कोळी बांधवांच्या स्वाधिन करण्यात आले, तेव्हा अनेकांना गलबलून आले. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले, अनेकांनी बाप्पाला हात उंचावून निरोप दिला, काही गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत होते तर, “ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची अशा निनादात गिरगाव चौपाटीचा परीसर दुमदुमून गेला होता . तर काहीजण केवळ हातजोडून बाप्पाच्या भव्यदिव्य मूर्तीकडे टक लावून पाहत होते. मनात घालमेल सुरू होती, डोळ्यातून अश्रू वाहत होते.

''ही शान कोणाची, लालबागच्या राजाची''; पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप
Deshdoot Special : अमित ठाकरेंचे नाशिकवर विशेष लक्ष; सलग दौर्‍यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

तराफाच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात येते. हायड्रोलिक मेकॅनिकली ऑपरेट केला जातो. पाणबुडी असते, पाणबुडीसोबत तज्ज्ञ आणि कोळीबांधव अत्याधुनीक तराफ्यातून खोल समुद्रात जाऊन बाप्पाचे विसर्जन करतात. दरम्यान, १० दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरूच असून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com