खासगी रुग्णालयांनी ‘यासाठी’ लसींचे डोस वाढवून मागावेत - आरोग्यमंत्री

खासगी रुग्णालयांनी ‘यासाठी’ लसींचे डोस वाढवून मागावेत - आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई / Mumbai - राज्यातील खासगी रुग्णालयांनी करोना प्रतिबंधक लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. करोना चाचण्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझिटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. आक्सिजनची तयारी पूर्णत्वाला नेतांना जिल्ह्यांनी त्याच्या तांत्रिक आणि दर्जात्मक गुणवत्तेची काळजी घ्यावी, परमिट टु वर्क चा परवाना मिळवावा, सर्व काम शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, करोना (coronavirus) उपचाराच्या दरासंदर्भात आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याची काळजी जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावी, यासाठी ऑडिटर्सची नियुक्ती करावी, कंटेन्मेंट झोन संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, लसीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते नागरिक दुसरा डोस घेतील हे पहावे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकार्‍यांनी दर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

या बैठका नियमित झाल्यास दाव्यांचे निकाली निघण्याचे प्रमाण वाढून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी सर्व जिल्ह्यांनी फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल करण्याच्या सूचनेचा पुनरूच्चार केला. जिल्ह्यांनी करोना बाधितांची माहिती दररोज अद्ययावत (रिअल टाईम डेटा) स्वरूपात अपलोड करावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com