मुंढेंच्या दणक्यानंतर खासगी रुग्णालयांनी करोनाबाधितांना परत केलेेे साडेदहा लाख

राज्यातील पहिलेच प्रकरण
मुंढेंच्या दणक्यानंतर खासगी रुग्णालयांनी करोनाबाधितांना परत केलेेे साडेदहा लाख

नागपूर | Nagpur -

करोनाग्रस्त रुग्णांकडून घेतलेले साडेदहा लाख रुपयांचे अतिरिक्त शुल्क नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या दणक्यांनतर रुग्णालयांनी संबंधितांना परत दिले आहेत. Municipal commissioner Tukaram Mundhe

नागपूरातील वोक्हार्ट आणि सेव्हन स्टार या रुग्णालयांनी करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांकडून अधिक शुल्क आकारल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुढें यांनी रुग्णालयांना नोटीस पाठवली होती. रुग्णांकडून घेण्यात आलेले अतिरिक्त पैसे परत करण्याचे आदेश आयुक्तांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. ही नोटीस पाठवल्याने रुग्णालयाने रुग्णांना साडेदहा लाख रुपये परत केले आहेत. यासंदर्भातील वृत्त मुंढे यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलं आहे. private hospitals Refund excess charges to corona patients after tukaram mundhe notice

मुंढे यांनी नोटीस पाठवल्यानंतर वोक्हार्ट रुग्णालयाने नऊ लाख 50 हजार तर सेवन स्टार रुग्णालयाने एक लाख रुपये रुग्णांना परत केले आहेत. कोणत्याही खासगी रुग्णालयाने अशाप्रकारे करोनाबाधित रुग्णांकडून घेतलेली रक्कम परत करण्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. रुग्णांकडून एवढी रक्कम का आकारण्यात आली यासंदर्भातील जाब मुंढे यांनी दोन्ही रुग्णालयांना विचारला होता. वोक्हार्टने कोणतेही उत्तर न दिल्याने मुंढेंनी रुग्णांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. तसेच पैसे परत न केल्यास साथ प्रबंध कायदा, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण कायदा आणि आवश्यक सेवा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशाराच मुंढेंनी रुग्णालयांना दिला. यानंतर दोन्ही रुग्णालयांनी रुग्णांना पैसे परत केले आहेत.

याच बातमीचे कात्रण ट्विट करत मुंढे यांनी, देशाचा कायदा आणि समानता हे समाजाच्या योग्य वाटचालीसाठी खूप महत्वाचे असतात. केवळ काद्यामुळे एखादा समाज ओळखला जात नाही तर तो कायदा कशा पद्धतीने अंमलात आणला जातो यावरुन समाजाची ओळख पटते. नागरिक, संस्था आणि सर्वांनीच कायद्याचे पालन केलं पाहिजे. या माध्यमातून सहकार्यामुळे एकमेकांनाच फायदा होईल, असं म्हटलं आहे.

मुंढेंच्या या ट्विटवर रिप्लाय देत अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com