पुण्यात खासगी डॉक्टरांनाही कोव्हिड रुग्णालयात  सेवासक्ती
राष्ट्रीय डॉक्टर दिवस

पुण्यात खासगी डॉक्टरांनाही कोव्हिड रुग्णालयात सेवासक्ती

पुण्यात खासगी डॉक्टरांनाही कोव्हिड रुग्णालयात 15 दिवस सेवासक्ती

पुणे (प्रतिनिधी) |Pune - पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील खासगी डॉक्टरांची सेवा अधिगृहीत केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कोव्हिड-19 सेंटर, कोव्हिड-19 रुग्णालयात सर्व डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती करण्यात आली आहे. जे डॉक्टर(doctor) सेवा देणार नाही त्यांच्यावर आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

पुणे शहरात करोना रुग्णांची सुमारे 1500-1600 च्या प्रमाणात तर पिंपरी चिंचवड मध्ये 700 च्या प्रमाणात वाढते आहे. मृतांची संख्याही वेगात वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचारासाठी हॉस्पिटल कमी पडतात. गंभीर झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेर मिळत नसल्याने मृत्यू आल्याच्या दोन्ही शहरात दोन घटना घडल्या. महापालिकेची यंत्रणा खूपच कमी पडत असल्याने आता खासगी डॉक्टरांना आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर(Shravan Hardikar) यांनी आएमए, निमा, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन अशा विविध संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि करोनासाठी सार्वजनिक रुग्णालयात सेवा देण्याची विनंती केली आहे. डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रसंगी खासगी दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी डॉक्टरांना आता कोव्हिड-19 सेंटरमध्ये सक्तीने 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. या आदेशातून 55 र्षांवरील आणि काही आजार असलेले डॉक्टर वगळण्यात आले आहेत. तुम्ही कुठे सेवा देणार यासंदर्भात येत्या तीन दिवसात डॉक्टरांनी माहिती द्यावी, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.पुणे शहरात सध्या कोव्हिड-19 सेंटर वाढवण्यात आले असून त्यासाठी पालिकेकडे डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांना आता 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुणे, पिंपरी पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना पत्र देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com