नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन
नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य

मुंबई / प्रतिनिधी

राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. मात्र राज्यातील करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच कडक निर्बंध शिथील करायचे की आणखी वाढवायचे हे अवलंबून असेल असे स्पष्ट करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा यालाच आमची प्राथमिकता असणार असल्याचे स्पष्ट केले.

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आले आहेत. राज्य सरकारने १ जूनपर्यंत र कठोर निर्बंध लावले आहेत. एकीकडे राज्य करोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना राज्याला करावा लागत आहे. राज्यातील कडक निर्बंध पुढे आणखी वाढवायचे की काय करायचे यावर आदित्य ठाकरे यांनी आज भाष्य केले.

राज्यात कडक निर्बंध असले तरी महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडायला मिळेल असे विचारत असाल तर ते पूर्णपणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य यांनी लसीकरण मोहिमेवरही भाष्य केले. आम्ही राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल. महाराष्ट्रात सर्वात जलद गतीने लसीकरण होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी लोकांचं लसीकरण केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

लसीकरणासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर असून जास्तीत जास्त पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न आहेत. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीकरण करण्याचे आव्हान सध्या आमच्यासमोर आहे असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com