पंतप्रधान 7 ऑक्टोबरला करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पंतप्रधान 7 ऑक्टोबरला करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे -

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने येत्या 7 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये पंतप्रधान

नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. डीईएसच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन शैक्षणिक धोरण व आत्मनिर्भर भारत या विषयावर 7 ऑक्टोबरला दुपारी 4.30 ते 5.30 या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी या विषयावर एक तास आधी चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com