Cyclone Tauktae : 'तौक्ते'चा राज्याला फटका, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत घेतली माहिती
Cyclone Tauktae : 'तौक्ते'चा राज्याला फटका, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई | Mumbai

तौत्के चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) राज्याला जबरदस्त तडाखा दिला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक परिसरात तुफान पाऊस बरसत आहे. वाऱ्याचा वेग देखील प्रचंड आहे.

गोव्यानंतर रविवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात तौत्के चक्रीवादळाने पाऊल ठेवलं. रात्रीपासून अद्याप चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून संथ गतीने गुजरातच्या दिशेनं जात आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि राज्याच्या इतर भागात पडझड झाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तौत्के चक्रीवादळाबाबत चर्चा केली. आणि महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती घेतली. पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेणार आहेत.

तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असलं, तरी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना मोठा फटका देत ते पुढे सरकत आहे. तसेच पुढच्या काही तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडेल, असं IMD ने सांगितलं आहे. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी 120 किमी पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर, ठाणेकरांनी सावध राहावं. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com