पंतप्रधान मोदींनी घेतली लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला दिली भेट
पंतप्रधान मोदींनी घेतली लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती

पुणे-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत असलेल्या कंपन्यांना भेटी दिल्या.

या भेटीमध्ये त्यांनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. मोदींनी गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले.

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला मोदींची भेटपंतप्रधान मोदी विशेष विमानाने आज दुपारी चार वाजता पुणे विमानतळावर पोहचले. तेथून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीते गेले. सायरस पुनावाला, अदर पुनावाला आणि नताशा पुनावाला यांनी मोदींचे स्वागत केले. तसेच पुनावाला यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोदींनी बैठक घेतली . मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली.

प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com