मराठी भाषा भवन प्रकल्पाच्या प्रस्तावाचे सादरीकरण

बांधकामास होणार सुरवात
मराठी भाषा भवन प्रकल्पाच्या प्रस्तावाचे सादरीकरण

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईत मरीन ड्राईव्ह Marine Drive -Mumbai येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या Marathi Bhasha Bhavan प्रत्यक्ष बांधकामाला येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. भवनाचे बांधकाम १८ महिन्यात पूर्ण करून ते जनतेसाठी खुले करण्याचे नियोजन आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांना मंगळवारी मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन मुख्य केंद्र प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी Architects आज सादरीकरण केले.

यावेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले. या प्रकल्पासाठी सरकारने २ हजार ५०० चौ.मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई Marathi Language Minister Subhash Desai यांनी यावेळी दिली.

कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, डॉ.पी.अनबलगन आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com