वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

मुंबई | Mumbai

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सुत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तसेच गेल्या चार दशकाहून अधिक काळ दूरदर्शनवर बातमीदारी केली. त्यांच्या निधनावर माध्यम क्षेत्र आणि इतर क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रदीप भिडेंच्या निधनाने आजच्या ठळक बातम्या असे सांगणारा भारदस्त आवाज बंद झाला आहे. विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com