आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; गृहमंत्र्यानी दिले 'हे' आदेश

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू; गृहमंत्र्यानी दिले 'हे' आदेश

मुंबई | Mumbai

गेल्या वर्षी अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे (Aryan Khan Cruise Drugs Case) सर्वत्र खळबळ उडाली होती. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात गौप्यस्फोट करणारे एनसीबीचे (NCB) पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे.

साईलचे वकील तुषार खंदारे (Tushar Khandare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील माहुल भागातील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) प्रभाकर यांचे निधन झाले. प्रभाकर साईल (Prabhakar Sail Death Case) यांचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता त्याच्या अंधेरी येथील दुसऱ्या निवासस्थानी नेण्यात आलं.

ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी प्रभाकर यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि केपी गोसावी (KP Gosavi) यांच्यावर २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. प्रभाकर साईल यांच्या मृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान प्रभाकर साईल यांच्या मृत्यूनं आता विविध चर्चा देखील होऊ लागल्या आहेत. हा मृत्यू नसून घातपात असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले आहेत.

'प्रभाकर साईल यांचा संशयास्पद मृत्यू मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सुरुवातीला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर या प्रकरणात प्राथमिक चौकशीत समोर काय समोर येते त्या दृष्टिकोनातून चौकशी करण्यात येणार आहे,' अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप पाटील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com