कोल्हापूर | Kolhapur -

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्याची भावना समाजाची आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने

जोर धरु लागली आहेत. मराठा समाजाला न्यायालयाच्या निकषावर टिकणारे आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरात विविध मराठा समाजाच्या संघटनानी रविवारी आंदोलन केले. क्षत्रिय मराठा समाजासह विविध संघटनांनी 12 वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल परिसरात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आरक्षण आमच्या हक्काचे अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तर मराठा मावळा ग्रुपने राज्य सरकार विरोधात मिरजकर तिकटी येथे निदर्शने केली. तर मावळा ग्रुपच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन करत आरक्षणाची मागणी लावून धरली.