महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता

आज दुपारी महत्वपूर्ण बैठक
महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले. त्यामुळे आज दुपारी ३.३० वाजता पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अंशत: लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परंतू, यात बहुतांश नियम शिथिल असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही.

अशा स्थितीत आता तातडीचा उपाय म्हणून राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात यावा अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या वेळी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले. त्यामुळे आज दुपारी 3.30 वाजता पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, राज्यात अंशत: लॉकडाऊन लावला असला तरी त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. नागरिक, दुकानदार नियमांचे अनेकदा उल्लंघन करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला नियमांमध्ये शिथिलता असल्याने कारवाई करण्यावरही मर्यादा आहे.

परिणामी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे आता लोकांकडूनच मागणी होत आहे की सरकारने कडक लॉकडाऊन लागू करावा. राज्य सरकारलाही त्या दृष्टीने गंभीर विचार करावा लागणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com