मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट?

मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट?

मुंबई | Mumbai

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे....

यामुळे सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. याचबरोबर गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. तसेच मुंबईतील अनेक गोष्टींवर आता बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याचे समजते. मुंबईतील प्रमुख ठिकाणांसह दहशतवादी व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत सध्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसी कलम 188 अंतर्गत शिक्षा केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट?
सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, दहशतवादी आणि देशद्रोही ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करू शकतात आणि व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट?
संजय राऊत लवकरच नाशिक दौऱ्यावर

त्यामुळे खासगी हेलिकॉप्टर, हॉट एअर बलूनसह अन्य संशयास्पद गोष्टींच्या वापरावर पुढील 30 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मुंबई पोलीस हवाई पाळत ठेवणार आहेत. हा आदेश 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com