मुंबई -

भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील. मात्र, भाजपा नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते अशी

टीका मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली असून या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल असेही ते म्हणाले.

टिकटॉक च्या माध्यमातून लोकप्रिय झालेली परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुजा चव्हाणची आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणावरून वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. आता मुख्यमंत्री राजीनामा स्विकारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.