पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट
पूजा चव्हाण आत्महत्या :  संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पुणे / Pune - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवलेल्या जबाबावरुन संजय राठोड (Sanjay Rathod) यांना क्लीनचीट मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक भूमिका घेत पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

काही महिन्यांपुर्वी बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा केली आहे.

त्या म्हणाल्या, संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चीट मिळाली असल्याच्या बातम्या दाखवल्या जात होत्या याची सत्यता पडताळण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. यावर पुणे पोलीस आयुक्तांनी अजून तपास सुरु असल्याचे म्हटलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत. न्याय मिळण्यासाठी एफआयआर देखील नोंदवण्यात आलेला नाही. याचे कारण सांगण्यात आले आहे की, पूजा चव्हाणच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांचा कोणावरही आरोप नसल्यामुळे कोणावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. अनेक क्लीप्स, फोटोज, रेकॉर्डींग बाहेर आल्या त्या आवाजावरुन लहान पोरगंही सांगु शकते की तो आवाज कोणाचा तसेच आम्ही सांगतो आहे की, हा आवाज संजय राठोड यांचा आहे असेही भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

पुणे आयुक्तांनी असेही म्हटलं आहे, क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही परंतु माध्यमांना किती वेळा सांगणार यामुळे चित्रा वाघ यांनी पोलिसांना विनंती केली आहे की, जर या गोष्ट खोटी असेल तर पुणे पोलिसांच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून सगळ्या प्रसार माध्यमांना त्याची माहिती द्यावी अशी विनंती करण्यात आले आहे. बातम्यांवरुन लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा डाव आहे का असा संशय निर्माण होत असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com