पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

सोलापूर -

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकसाठी उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. कोरोना विषयक सर्व नियम पाळून 524 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 3 लाख 40 हजार 889 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

दरम्यान, ही पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com