'त्या' विधानावर नारायण राणेंना पोलिसांची नोटीस; पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

'त्या' विधानावर नारायण राणेंना पोलिसांची नोटीस; पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून राणे कुटुंबीयांच्या (Rane Family) भोवती फिरत आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी (Police) नोटीस पाठवली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस बाजवण्यात आली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली आहे. नोटीसनुसार, आज दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली आहे.

काल नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता की, नितेश राणे (Nitesh Rane) सध्या कोठे आहेत? परंतु, ते कोठे आहेत हे मला माहित असेल तरी मी तुम्हाला का सांगांव? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी केलं होतं नारायण राणे यांच्या याच बोलण्यावरून त्यांना नितेश राणे कोठे आहेत हे खरच माहित आहे का? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com