नवापुरात पोलिसांना घरात डांबून मारहाण
महाराष्ट्र

नवापुरात पोलिसांना घरात डांबून मारहाण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जुगार बहाद्दरांची दादागिरी वाढली

नवापूर शहरातील गडी मस्जिद परिसरात जुगार खेळणार्‍या व्यक्तीविरूध्द कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांना दमदाटी करून धक्काबुक्की करत घरात डांबून ठेवल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील गडी मस्जिद परिसरात पोलीस शिपाई दिनेश बाविस्कर व श्याम पेंढारे हे मटका जुगार खेळणार्‍या व्यक्तीविरूध्द कारवाई कारण्यासाठी शासकीय काम करीत असतांना अक्रम अब्दुल शेख याने त्यांना घरात बोलावून घराचे दार बंद करून दमदाटी केली. त्याच्या आईला संबंधीत पोलीसांवर विनयभंगचा गुन्हा दाखल करुअशी चिथावणी देण्यास सांगितले.

अक्रम अब्दुल शेख याने दिनेश बाविस्कर यांची कॉलर पकडून धक्काबुकी केली व इम्रान अब्दुल शेख याने श्याम पेंडारे यांना धक्काबुक्की करून दोघा पोलीस कर्मचार्‍यांना घरात डांबून ठेवले व दमदाटी केली. याबाबत पोशि दिनेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात अक्रम अब्दुल शेख, इम्रान अब्दुल शेख दोन्ही रा. गडी मस्जिदजवळ यांच्याविरूध्द भादंवि कलम 353, 342, 332, 506, 109, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सपोनि शिंपी करीत आहेत. पोलिसांचा धाक संपला असून कारवाईसाठी जाणार्‍या पोलिसांनाच आता जुगारबहाद्दर मारहाण करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com