मुंबई -

पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच स्वतःवर गोळी झाडून कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे. हा प्रकार

नालासोपार्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी (23 डिसेंबर) रात्री घडला. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

सखाराम भोये असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

ही घटना गुरुवारी (24 डिसेंबर) सकाळी 6 वाजता उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचार्याने एवढे टोकाचं पाऊल का उचलले असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सखाराम भोये 2003 च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. 2016 पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. बुधवारी त्यांची रात्रपाळी होती.

रात्रपाळी संपून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी सरकारी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्यावर काही कामाचा ताण होता का की अन्य काही कारण होतो याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली आहे.