पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

पुणे | Pune

कुठलेही वैध कागदपत्रे नसताना पाकिस्तानी तरुण पुण्यात वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुहम्मद अमान अन्सारी असे त्याचे नाव आहे....

मिळालेल्या माहितीनुसार, मुहम्मद अमान अन्सारी याने खोटी कागदपत्रे वापरून भारतीय पासपोर्टदेखील काढला आहे. पासपोर्टचा वापर करून त्याने पुणे ते दुबई असा प्रवासही केला.

तरूणाचे वडील पाकिस्तानी असून आई भारतीय असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
सिद्धू मूसेवालाला का मारलं?; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट

खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत भवानी पेठेतील चुडामण तालमीजवळ तो वास्तव्य करत होता. २०१५ पासून आजपर्यंत बेकायदेशीरपणे कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पुण्यात सापडला पाकिस्तानी तरुण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?
राज्यपालांच्या 'त्या' भूमिकेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

खोटी कागदपत्रे वापरून त्याने भारतीय पासपोर्ट काढला आहे. या पासपोर्टचा वापर करून परदेशात प्रवासही केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com