जय हरी विठ्ठल! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

कसा असेल नवा मार्ग? पहा व्हिडीओ…
जय हरी विठ्ठल! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पंढपूरात पालखी मार्गाचे उद्धाटन झाले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात उपस्थिती लावली.

पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे २२५ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वारकऱ्यांच्या उपस्थितीत या पालखी मार्गाचं उद्धाटन करण्यात आलं.

कसा असेल पालखी मार्ग?

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जाणार आहेत. त्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे २२१ किलोमीटर, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे-बोंडाळे असा सुमारे १३० किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ६ हजार ६९० कोटी आणि ४ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com