Modi in Nagpur : नागपूरकरांना मेट्रोचं गिफ्ट, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

नागपूर | Nagpur

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले.

वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी मेट्रो स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान फ्रीडम पार्क येथून मेट्रोने खापरीला रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक, महिला व मुलांशी त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधान यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ४० किलोमीटर असून एकूण खर्च ९ हजार २७९ कोटी रुपये आहे. प्रवासी क्षमता १ लाख ५० आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो दोन या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांचा हस्ते झाला आहे.

नागपूर मेट्रो-२ हा एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्याअंतर्गत ४३८ किलोमीटरची मेट्रो लाईन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत पूर्ण होईल. खापरीला बुटीबोरी एमआयडीसी (१८.६ कि.मी. ) ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हान (१३ किमी ) प्रजापतीनगरला कापसी (५.५ कि.मी.) तर लोकमान्यनगरला हिंगणा(६.७ कि.मी.) शहराशी जोडले जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com