पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाहतुकीत केले 'हे' मोठे बदल

पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाहतुकीत केले 'हे' मोठे बदल

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे मुंबईत एक रोड शो सुद्धा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत...

सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान मोदी मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. सायंकाळी 6:30 वाजता ते मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या दोन लाईनचे उद्घाटन करतील आणि मेट्रोचा प्रवासही करतील. मुंबईत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाहतुकीत केले 'हे' मोठे बदल
शुभमन गिलनं किवीला धुतलं; द्विशतक झळकावणारा जगातील सर्वात युवा फलंदाज

वाहतुकीत 'हे' बदल

१) गुरुवारी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सर्व रस्त्यांवरील अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यातून रुग्णवाहिका, शाळेच्या बस आणि इतर बस वगळण्यात आल्या आहेत.

२) गुरुवारी दुपारी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बीकेसी रोडवरील एमएमआरडीए जंक्शन ते एमटीएमएल जंक्शनपर्यंतची वाहतूक नियमन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे.

३) पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सी लिंककडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाहतुकीत केले 'हे' मोठे बदल
नाशकात चाललंय तरी काय? पुन्हा एकाचा निर्घुण खून

४) संत ज्ञानेश्वर मार्गावरुन आयकर विभाग जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे जातील.

५) खेरवाडी शासकीय वसाहत मनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मिकी नगर येथून यू टर्न घेऊन शासकीय वसाहत मार्ग कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी टी जंक्शन पुढेवरुन कुर्ल्याकडे जातील.

पंतप्रधान मोदी आज मुंबईत; वाहतुकीत केले 'हे' मोठे बदल
मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात; १३ ठार, २३ जखमी

६) सर्व जंक्शन व रजाक जंक्शनवरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून एसीएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मुख्यद्वार, आंबेडकर जंक्शन, हंसमुखा जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी जातील.

७) पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, आयकर विभाग जंक्शन, कौटुंबिक न्यायालय, एमएमआरडीएवरुन पुढे जातील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com