पिंपरीत आढळला बॉम्ब

पिंपरीत आढळला बॉम्ब

पुणे | प्रतिनिधी| Pune

पिंपरीमध्ये आज (सोमवारी) सकाळी शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ ही वस्तू आढळली आहे.

पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ कोहिनुर टॉवर ही सोसायटी आहे. सोसायटी जवळ मोकळी जागा असून तिथे अतिक्रमण झाले होते. सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्यात आले. त्यावेळी बॉम्ब आढळून आला.सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीतील जाणकारांना व्हिडीओ कॉलवरून माहिती दिली.

त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पिंपरी पोलीस तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे.

हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे.यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com