पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशविसर्जन; 'ती' याचिका उच्च न्यायालयाने

पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशविसर्जन; 'ती' याचिका उच्च न्यायालयाने

पुणे| Pune

पुण्यातील पाच मानाच्या गणपतींविरोधात (Pune Ganapati Visarjan) न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे मानाच्या गणपतींच्या विसर्जनाचा पहिला मान कायम राहणार आहे.

पुण्यातील पाच मानाच्या गणपतींविरोधात बधई समाज ट्रस्टने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High court) निकाली काढली. लक्ष्मी रोडवरून प्रथम पाच मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूकच सुरू होण्याच्या प्रथेविरोधात आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.

न्यायालयाचा निकाल काय ?

या याचिकेत अन्य याचिकाकर्ते नसल्याने याचा विस्तृत विचार करून सरसकट आदेश देता येणार नाही. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिवणुकीला अमुक तासच लागतील वगैरे मुद्देही गृहीत धरता येणार नाहीत, असे आदेश न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लद्धा यांच्या खंडपीठाने दिले.

याचिकेत काय होते?

पुणे शहरात लक्ष्मी रोडवरून गणपती विसर्जन मिरवणुकीच्यावेळी शहरातील पाच मानाच्या गणपतींना प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रूढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विसर्जन मिरवणूकीला रस्ता खुला केला जातो. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. असा दावा करत 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात धाव घेत याचिका दाखल केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com