मुंबई वगळता राज्यात गरबा रंगणार!

करोना नियमांचे पालन करावे लागणार
मुंबई वगळता राज्यात गरबा रंगणार!

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

कोरोना Corona संसर्गाच्या साथीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना गरबा Garba खेळता येणार नसला तरी राज्य सरकारने मुंबईबाहेर गरबा खेळण्यास परवानगी दिली Garba allowed to play outside Mumbaiआहे. त्यासाठी कोरोना नियमांच्या अटी घालून दिल्या आहेत.

येत्या गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) राज्यात शारदीय नवरात्रोत्सवाला Navratri Festival प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने यंदाही गरबा खेळता येणार किंवा कसे याविषयी गरबाप्रेमींमध्ये संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी मुंबई सोडून राज्यभरात गरबा खेळता येणार असल्याचे जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु त्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाची मान्यता आहे. त्यामुळे तीन पद्धतीने गरबा साजरा होईल. खुल्या मैदानात, सभागृहांमध्ये गरबा खेळला जातो. खुल्या मैदानात गरबा खेळताना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करता येणार आहे. सभागृहात गरबा खेळताना त्याच्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच लोक येतील याची दक्षता घ्यावी लागेल. याबरोबरच कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे state Health Minister Rajesh Tope यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.