राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार?, आरोग्यमंत्री म्हणाले...

राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार?, आरोग्यमंत्री म्हणाले...

मुंबई l Mumbai

राज्यात करोना (covid19) रुग्णआलेख घसरू लागल्याने ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात टास्क फोर्सने (task force) सुद्धा महत्त्वाचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्तवाची माहिती दिली आहे.

राजेश टोपे यांनी म्हंटलं आहे की, 'चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल.'

पुढे बोलतांना राजेश टोपे म्हणाले की, 'नाट्यगृह, सिनेमागृहांना आता ५०% परवानगी दिली आहे. ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. सध्या लग्नसराईमुळं गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही. बिनधास्तपणा जाणवतोय. ही मानसिकता घातक आहे. जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे,' असंही टोपे म्हणाले.

तसेच १२ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी कोरेक्स लस वापरण्यात यावी अशा बाबतचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात मुबलक पुरवठा असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर १२ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com