परमबीर सिंह भारतातच! लवकरच तपास यंत्रणेसमोर होणार हजर?

परमबीर सिंह भारतातच! लवकरच तपास यंत्रणेसमोर होणार हजर?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याविरोधात १०० कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे कोर्टानं चार दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं. मात्र परमबीर सिंग देशातच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परमबीर सिंग लवकरच तपास यंत्रणेसमोर हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईचे माजी गृहमंत्री परमबीर सिंह हे फरार नाहीत. तर ते केवळ लपून बसले आहेत. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ते लपून बसल्याचा दावा परमबीर सिंह यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. तसेच पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे.

परमबीर सिंह यांच्या वकिलांनी दावा करताना न्यायालयात म्हटले की, परमबिर सिंह फरार नाहीत. त्यांना कोठोही पळून जायचे नाही. केवळ त्यांच्या जीवाला मुंबई पोलिसांकडून धोका आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून धमकी मिळाली आहे. त्यामुळे ते लपून बसले आहेत, असेही परमबीर सिंह यांचे वकील न्यायालयात म्हणाले.

तसेच अनिल देशमुख आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच याप्रकरणी आम्हाला वेगळं चित्र दिसत असून देशमुख आणि सिंह यांच्यातील लढाई अधिक उत्सुकतेची बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. परमबीर सिंह आणि संजय पांडे यांच्यात झालेल्या संवादावर देखील सर्वोच्च न्यायालयाने टीप्पणी केली आहे. पोलिस आयुक्त अशा जबरी कारवाया करत असतील तर सामान्य माणसाचे काय होत असेल? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

परमबीर सिंह हे अनेक समन्स बजावूनही चौकशी समितीसमोर उपस्थित राहात नाहीत. तसेच, ते कोठे आहेत याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषीत करावे अशी मागणी मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या अर्जाला परवानगी देत परमबीर सिंह यांना फरार घोषीत करण्यास न्यायालायने कोणताही आक्षेप घेतला नाही. दरम्यान, न्यायालयाने हिरवा कंदील दाखवतातच परमबीर सिंग, रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com