पंकजा मुंडे यांना करोनाची लागण

पंकजा मुंडे यांना करोनाची लागण

मुंबई | Mumbai

गेल्या वर्षभरापासून करोनाच संकट सुरु आहे. अनेक मोठमोठे नेते, सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

आता भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील करोनाची लागण झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे की, म्हटले की, “मी करोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, करोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्‍यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी” असे त्यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच पंकजा यांनी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांचे खाजगी अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे करोनामुळे निधन झाले होते. गोविंद मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'माझ्या परिवारातील एका तरूण, मेहनती व धाडसी सदस्य आपण गमावला आहे, त्यांच्या कुटूंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो' अशा शब्दांत त्यांनी गोविंद मुंडे यांच्याप्रती शोक व्यक्त केला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com