आषाढी वारीमुळे करोना नामशेष होईल

संभाजी भिडे यांचे अजब वक्तव्य
आषाढी वारीमुळे करोना नामशेष होईल

सांगली / Sangli - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी पंढरपूर वारी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्यात आली आहे. मात्र, 10 महत्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे. या 10 मानाच्या पालख्यांना 20 बसच्या माध्यमातून पंढरपुरात जाता येणार आहे.(Pandharpur Ashadi Wari) पण पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही असून याप्रकरणी वारकर्‍यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) देखील पुढे आले आहेत. त्यांनी पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी (collector abhijit chaudhary) यांच्याकडे केली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन पायी वारीच्या मागणीचे निवदेन दिले आहे. या भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे संभाजी भिडे यांनी अजब वक्तव्य केले आहे. संभाजी भिडे म्हणाले की, पंढरीची आषाढी वारी झाल्यामुळेच देशातील नव्हे तर जगातील कोरोना आटोक्यात नाही तर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्या तर हे विघ्य नष्ट होईल. आपल्या सगळ्यांचा वाटतं, कोरोनामुक्त हिंदुस्थान व्हावा आणि ते घटणार. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी.

दरम्यान, यंदा करोना (coronavirus) संकटामुळे सर्व 10 पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील देहू आणि आळंदीमधील पालखीच्या प्रस्थानासाठी 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित 8 पालख्यांना प्रत्येकी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पण या वार्‍या पायी होणार नसून एसटीने होणार आहे, याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com