धक्कादायक! विद्यार्थ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

भिवंडी | Bhiwandi

आज मेरी पाठशाला या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन (Agitation) सुरु होते. यात विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या (Pakistan Zindabad) घोषणा दिल्या असून पोलिसांनी (Police) १९ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून भिवंडी येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांना मेरी पाठशाला या संघटनेने पाठबळ दिले आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते.

या ठिकाणी आज दुपारी एका विद्यार्थ्याने भाषण देत असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर तेथे गोंधळ सुरु झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीचार्जदेखील करावा लागला. यात १४ पुरुष आणि ५ महिला, अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com