खळबळजनक! भर चौकात डोक्यात फावडे मारून विभक्त पत्नीची पतीकडून हत्या

खळबळजनक! भर चौकात डोक्यात फावडे मारून विभक्त पत्नीची पतीकडून हत्या

पैठण | प्रतिनिधी

विभक्त राहत असलेल्या पत्नीचा चरित्राच्या संशयावरुन पतीने डोक्यात फावडेने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. सकाळी साडे सात वाजता शहरातील गजबजलेल्या नेहरु चौकात भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून त्याच्या शोधार्थ पोलिसांनी तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मजुरी करणारा ज्ञानेश्वर पुंडलिक पोळ रा. भवानीनगर, नविन कावसन, पैठण) याचे मंदाबाई ज्ञानेश्वर पोळ (वय २८, रा. संतोषी माता मंदिर जवळ पावर हाऊस आंबेडकर चौक, पैठण) हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. मात्र पती ज्ञानेश्वर हा तीन वर्षांपासून सतत तिच्या वर संशय घेऊन शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देत. या त्रासाला कंटाळून मंदाबाई हिने विभक्त होत आपल्या बहिणीकडे राहत होती.

मंगळवारी सकाळी साडे सात वाजता मंदाबाई नेहरु चौकातील रस्त्यावरुन जात असतांना पती ज्ञानेश्वर याने तिला गाठून वाद विवाद करीत हातातील फावड्याने डोक्यावर जोरदार प्रहार केले. वार वर्मी लागल्याने मंदाबाई जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. काही नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मंदाबाई तपासून मयत घोषित केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधार्थ तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली आहे.

याप्रकरणी मयत महिलेची बहिण इंदुबाई विष्णु बर्फे (वय ३५ वर्षे, रा. संतोषी माता मंदीर जवळ, पावर हाऊस, पैठण) हिच्या फिर्यादीवरून गुरन कलम ४४४/२०२२ कलम ३०२,३२३, ५०४, ५०६, भादंवी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर पवार, पोउपनी बुरकुल, पो.का. सुधीर ओव्हळ, नरेंद्र अंधारे, मुकुंद नाईक, कल्याण ढाकणे आदी करीत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com