
पैठण | प्रतिनिधी
आता पर्यंत नगरपरिषदेच्या स्थापनेपासुन कधी नव्हे असा एक दिवसाआड पाणी पुरवठा निर्णय नगरपरिषद प्रशासन घेतला आहे. त्यामुळे पैठणकरांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
"धरण उशाला कोरड घशाला" या म्हणी प्रमाणे व नाथ सागरात भरपूर पाणीसाठा असुन सुद्धा पैठणकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मोटारीने पाणी पंपिंग होत नसल्याने कारण पुढे करून हा निर्णय घेतल्याचे समजते. हा महंमद तुघलकी निर्णय म्हणावा लागेल.
वास्तविक पाहता मोटारी पाणी कमी मारत असेल तर नव्या मोठ्या मोटारी आणा पण पैठणकरांना वेळेत भरपूर पाणी द्या. असा सूर सर्व सामान्यांतून उठत आहे. पैठण नगर परिषदची स्थापन झाल्यापासून असा निर्णय पहिल्यांदाच घेतला गेल्याचे जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसने विरोध म्हणून एक निवेदन दिले तर अण्णा हजारे विरोधी जन आंदोलन न्यास व अ.भा.छावा संघटनेने आंदोलना इशारा दिला आहे. त्यानंतर कुठल्याही पक्षाने किंवा इतर संघटनेने यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नसून पैठणकर यांना याचे गांभीर्य व सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. पाणी वेळेवर तर मिळत नाही पण ते पूर्ण वेळ मिळत नसल्याची खंत महिलावर्ग करताना दिसत आहे.
औरंगाबाद, जालना व इतर ठिकाणी रात्रंदिवस वीज पुरवठा व रात्रंदिवस मोटारी सऱ्यास चालतात त्यांचा बिघाड झाल्यास पर्यायी मोटारी शिल्लक असतात. परंतू पैठण नगर परिषदला याचे गांभीर्य असलेल्या दिसत नाही.