पैठण येथील नाथ मंदिरात दररोज 'इतक्या' भाविकांना प्रवेश

पैठण येथील नाथ मंदिरात दररोज 'इतक्या' भाविकांना प्रवेश

पैठण | प्रतिनिधी

श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर उद्यापासून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच फलोत्पादन मंत्री तथा नाथ मंदिर ट्रस्ट अध्यक्ष संदिपान भुमरे यांच्या सुचनेनुसार उद्या गुरुवार ता.७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर विधीवत पुजा करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुली करण्यात येणार आहे. नाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दादा बारे यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

करोनाचे सर्व नियम पाळून दररोज ५ हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी भाविकांना येतांना मास्क बंधन कारक असेल, सँनिटायझर वापर करणे बंधनकारक असेल, करोना प्रतिबंधक लसीचे २ डोस झाल्यांनाच प्रवेश देण्यात येईल. वयोवृद्ध, लहान मुले,गरोदर स्त्रियांना प्रवेश नसेल, सुरक्षित अतंर ठेवणे बंधनकारक असेल. अशा प्रकारे नाथ मंदिर ट्रस्ट यांनी नियमावली सादर केली. अशा प्रकारे सरकारने दिलेले नियम पालन करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. यावेळी सल्लागार नंदलाल काळे, नाथ विश्वस्त दादा बारे, ह.भ.प.रघुनाथ महाराज गोसावी, ह.भ.प.विठ्ठल चनघटे, कैलास बोबडे, गजानन झोल, अमोल जाधव, महेश खोचे, पांडुरंग निरखे, राजेंद्र गोर्डे, मारुती वाणी, मच्छिंद्र निवारे, राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.