पन्नास खाटांवरील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बंधनकारक

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
पन्नास खाटांवरील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बंधनकारक

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात ५० खाटांवरील रुग्णालयांना ( Hospitals ) स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा ( Oxygen production Plant )असणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Medical Education Minister Amit Deshmukh ) यांनी गुरुवारी दिली.

करोना( Corona ) रुग्णांची संख्या आटोक्यात जरी येत असली तरी करोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णालयांनी स्वत: ऑक्सिजन निर्मिती प्लांट निर्माण करणे गरजेचे आहे, असेही देशमुख यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून करोना परिस्थितीशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. या काळात कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा उभारणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णालय तयार करणे, आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण करणे, ऑक्सिजनची उपलब्धता निर्माण करणे यासारख्या अनेक उपाययोजना याकाळात करण्यात आल्या. महाराष्ट्रावरील संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नसून अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आपले दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकारच्या या सर्व प्रयत्नात सर्वसामान्यांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राज्यात करोनाचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आल्या. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदाला आणण्याचा प्रयत्न होत असताना शाळा-महाविद्यालय सुरु करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल असा विश्वासही अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com