राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

मुंबई | Mumbai

राज्यात पावसाने (Rain) पुन्हा थैमान घालण्यास सुरू केली आहे. काल राज्यात नाशिक (Nashik), पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) आणि विदर्भातील (Vidarbha) काही भागांत विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस (Rain) झाला...

पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. गणेश विसर्जनावर पावसाचे सावट असल्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला.

बुधवारी दुपारनंतर मुंबईसह सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधारेने झोडपले. नागपुरातही ढगफुटीसदृश पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यालाही पावसाने झोडपले.

राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?
पावसाचे थैमान! बंगळुरुत जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी साचले पाणी; 'पाहा' फोटो...

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज 8 सप्टेंबर रोजी सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्या 9 सप्टेंबरला रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?
ढगफुटी सदृष्य पावसाचा हाहाकार; पिकांचे नुकसान

10 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?
जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्याकडे 'इतक्या' पाण्याचा विसर्ग

11 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com