मुंबई -

कृषी कायद्याला विरोध करणे म्हणजे लोकशाहीमध्ये घटनेला धक्का देण्यासारखे आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी कृषी कायद्यावरून भूमिका स्पष्ट केली. कृषी कायदा हा शेतकर्यांच्या हिताचा कायदा आहे. कृषी कायदा रद्द करण्याची मागणी ही लोकशाहीमध्ये घटनेला धक्का देणारी आहे.

या कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्याचा अधिकार शेतकर्यांना आहे. आंदोलन करण्याचाही त्यांना लोकशाहीत अधिकार आहे. परंतु आडमुठी भूमिका घेऊन केवळ कायदा रद्द करा, अशी मागणी जर केली आणि सरकारने ती मान्य केली. तर सगळे कायदे रद्द करावे लागतील. कारण प्रत्येक कायद्याला विरोध हा होतच असतो.

त्यामुळे शेतकर्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मला वाटते. शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टी यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण कृषी कायदा मागे घेण्याची मागणी सोडून त्यात बदल करणे सुधारणा करणे, अशी मागणी त्यांनी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.