वडेट्टीवारांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून गंभीर दखल; धमकी देणाऱ्यांवर होणार कारवाई

वडेट्टीवारांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून गंभीर दखल; धमकी देणाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांच्यासदंर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विधासभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना फोनवरून आणि मेसेजेद्वारे (Threat Calls to Opposition Leader Vijay Waddettiwar) धमकी देण्यात आली होती. वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची आता गृहविभागाने गंभीर दखल घेतली असून धमकी देणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

धमकीचा फोन आणि मेसेज मिळाल्याची गंभीर बाब वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन धमकी देणाऱ्यांबाबत माहिती घेतली आहे. तसेच वडेट्टीवार यांना फोनवर धमकी देणाऱ्यांच्या फोन नंबरची पोलीसांनी नोंद घेतली असून धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.

दरम्यान, सोमवारी रात्री पोलिस अधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच धमकी देणाऱ्यांचे नंबर घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. सध्या विजय वडेट्टीवार यांवा वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात येते. तीन जवान आणि एक गाडी तैनात असते. मात्र लवकरच त्यांची सुरक्षा वाढवण्यात येईल, त्याबाबत गृह विभागाने हालचाल सुरू केली आहे.

यावेळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली होती. मात्र या भूमिकेमुळे आणि जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलल्यानंतर वडेट्टीवर यांना धमकी मिळाली. धमकी मिळाल्याची घटना वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कळवली होती.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com