मुंबई | Mumbai

राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होऊ घातलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्यण घेतला आहे. तसेच ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात

आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. या विषयावरून आता जोरदार राजकारण तापल्याच पाहायला मिळत आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे.

परीक्षा झालीच पाहिजे - रोहित पवार

करोनाचे नियम पाळून एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट करुन म्हटलं आहे की, "करोनामुळे यापुढे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपण याकडे लक्ष द्यावं, ही विनंती!"

हे अगदी चुकीचे झाले - पंकजा मुंडे

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द केल्या आहेत हे अगदी चुकीचे झाले आहे असं म्हंटल आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, एमपीएससीच्या परीक्षा सरकारने रद्द आहेत हे अगदी चुकीचे आहे. एमपीएससीची तयारी करणारी मुलगा किंवा मुलगी हे शहरात अत्यंत हलाखीच्या परस्थितीत राहत असतात. अभ्यासीका जॉईन करून रात्रांदिवस आभ्यास करतात. अचानकपणे परीक्षा रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे असं मला वाटत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सर्व व्यवहार आणि व्यवसाय हे कोरोनाच्या अख्याधारित राहून चालू आहेत, मग एमपीएससीची परीक्षा का नाही असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थित केला आहे. परीक्षा रद्द केल्यान अनेक मुलाचं नुकसान होईल, त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण होईल. हा निर्ण्याबाद्द्ल मी तीव्र नापसंती व्यक्त करत असलायचं देखील मुंडे यांनी म्हटलं आहे.

परीक्षांबाबत सरकारने नियोजन केले नाही- प्रविण दरेकर

यावेळी भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर म्हणाले की, राज्य सरकार म्हणते की कोरोना काळात महाराष्ट्र काही थांबला नाही. हे केवळ बोलून चालत नाही तसे करावे लागते. कोरोना काळात नियोजन करावे लागते. एमपीएससीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने काही नियोजन केले नाही. केवळ करोनाचे कारण दाखवून परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. तसेच, 'लोकलमध्ये लाखो लोक दाटीवाटीने प्रवास करतायत. अधिवेशनही झालं. काँग्रेसच्या आंदोलनात लाखो लोकं होते. वरळीत पब सुरू, परीक्षाही घेता आल्या असत्या…, असं ट्वीट दरेकरांनी केलं आहे.

भाजपा आमदार नितेश राणेंनी पुन्हा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. 'MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुलं परीक्षेला बसली नाही, म्हणून वाट्टेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परीक्षेमध्येच करोना होणार..रात्रीच्या पार्टीमध्ये नाही? असं नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नाही पृथ्वीराज चव्हाण

अचानक परीक्षा पुढे ढकलणे योग्य नसल्याचं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. परीक्षेबाबत अनिश्चितता तयार करणे योग्य नसून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी देखील केली चव्हाण यांनी केली आहे.

तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही - गोपीचंद पडळकर

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर बोलतांना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच १ लाख विद्यार्थी MPSC च्या परीक्षेसाठी पुण्यात राहतात, दर महिन्याला ९ ते १० हजार रुपये घराचे भाडे देतात, परंतु सरकारला या विद्यार्थ्यांसाठी काही देणंघेणं नाही. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, सरकार निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही. पोलिसांनी दादागिरी करू नये असं आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय अस ट्विट करून सरकार वर निशाना साधला आहे. महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थी MPSC परीक्षेची वाट पहात होते परंतु कोरोनाचे गोजिरवाणे कारण देऊन परिक्षा अचानक पुढे ढकलली,कोरोना ची पुरेपूर काळजी घेऊनही परीक्षा घ्यायला हरकत नव्हती.पण सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळंच करायचं ठरवलंय मग पर्याय कसा सुचेल? अस ट्विट करून राम सातपुते यांनी सरकारवर टीका केली आहे.