अफूच्या बोंडाचा चुरा या अमली पदार्थाची गॅस एजन्सीच्या आड विक्री

आंतरराज्य विष्णोई टोळीचा पर्दाफाश || 7 जण जेरबंद
अफूच्या बोंडाचा चुरा या अमली पदार्थाची गॅस एजन्सीच्या आड विक्री

पुणे|प्रतिनिधी|Pune

राजस्थान येथुन पिंपरी चिंचवड परीसरात मोठया प्रमाणात अफूच्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) हा अमली पदार्थ आणून गॅस एजन्सीच्या आड विक्री करणारे आतरराज्य विष्णोई टोळीचा गुन्हे शाखेच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल , तीन जिवंत काडतुसह, ११० किलो पॉपी स्ट्रॉ व अफिम जप्त केले आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

जयप्रकाश साईराम खीचड (२४, रा. तिसरा मजला मोकाशी हाईट सांगवडे , ता. मावळ जि. पुणे), महेश कुमार उर्फ श्याम बाखाराम बिष्णोई, विकास मोहनराम बिष्णोई, पप्पू उर्फ भगवानराम खमुराम बिष्णोई, सुरेशकुमार जगलागाराम सियाक बिष्णोई (दोघे रा. मोकाशी हाईट सांगवडे, ता. मावळ जि. पुणे मुळ रा. जोधपुर राजस्थान), महिपाल जंगलानाराम सियाक बिष्णोई, विकास डाका बिष्णोई (रा. मोकाशी हाईट सांगवडे , ता. मावळ जि. पुणे मुळ रा जोधपुर राज्यस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पिंपरी–चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपुन छपुन होणारी अंमली पदार्थाची विकी , साठवणुक व वाहतुकीस पूर्णपणे प्रतिबंध व्हावा याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार तपासणी करत आहेत. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढणे व रेकॉर्ड वरील आरोपी चेक करण्याकरिता वाकड , हिंजवडी पोलिस स्टेशन चे हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरु आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे दोन्ही पथके पेट्रालिंग करीत असतांना पोलिस अंमलदार प्रदीप शेलार व संदीप पाटील यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. सांगावडे गावाच्या हद्दीमध्ये एक इसम हा नशा करण्याकरीता लागणाऱ्या अफूचे बोंडाचा डूडा चरा (पॉपी स्ट्रॉ) बाळगुण त्याची विक्री करीत आहे . मिळालेल्या माहितीनुसार जांभे , सांगवडे गावाच्या हद्दीत छापा मारला असता सदर ठिकाणी एक पिवळे रंगाचा भारत गॅस टेम्पोचे ड्रायव्हर सीटवर व मोकाशी हाईटचे टेरेसवरील रुममध्ये १८ लाख ५९ हजार ४९५ रुपये किंमतीचा ११० किलो अफूचे बोंडाचा डूडा चुरा (पॉपी स्ट्रॉ) , ५६ ग्रॅम अफिम व एक देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुस आढळून आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com