आयटीआय
आयटीआय
महाराष्ट्र

उद्यापासून ऑनलाईन आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू

प्रक्रिया नियोजनासाठी समिती स्थापन

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | Satpur

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

'आयटीआय साठी यापूर्वी, राज्य स्तरावर ३० टक्के तर तालुका स्तरावर ७० टक्के प्रवेश दिले जात होते. यंदा जिल्हास्तरावर ७० टक्के तर राज्यस्तरावर ३० टक्के प्रवेश दिले जाणार आहेत. यामुळे तालुका स्तरावर प्रवेश फेऱ्या वाढत असल्याने संधी मिळाली नसल्यास विद्यार्थ्यांना अपेक्षित ट्रेडसाठी जिल्ह्याच्या बाहेर जावे लागत होते.

आता प्रक्रीया चार फेरीमध्ये राबविली जाणार आहे. यात जिल्हा स्तरावर ७० टक्के प्रवेश दिले जाणार असल्याने उमेदवारांना स्थानिक पातळीवर प्रवेशाची संधी वाढली आहे.

'आयटीआय मध्ये दिव्यांगांना अनुरुप ठरणाऱ्या विविध टेडची माहिती देण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी अँपचा वापर केला जाणार आहे.

वेबसाईटवर इत्यंभूत माहिती

आयटीआय प्रवेशासंबंधित नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपद्धती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल (Skill Gap Study Report), व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपद्धती इत्यादींबाबतची माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपूर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.

Deshdoot
www.deshdoot.com