महापरिनिर्वाण दिन : 'या' ठिकाणी करा घरबसल्या ऑनलाईन अभिवादन

दादर चैत्यभूमी येथील लाईव्ह सोहळा
महापरिनिर्वाण दिन : 'या' ठिकाणी करा घरबसल्या ऑनलाईन अभिवादन

मुंबई | Mumbai

करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षी प्रमाणे साजरा करणे शक्य होणार नाही.

मात्र ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. चैत्यभूमीवरील मानवंदना आणि पुष्प वर्षावाचे थेट प्रक्षेपण सरकारतर्फे युट्युब, फेसबुक, ट्विटर आणि दूरदर्शन सह्याद्री वर करण्यात येत आहे.

करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमी स्मारकावर न येण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.

या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद आंबेडकरी अनुयानांनी दिला आहे. दरवर्षी वीस लाखाच्या आसपास जनसमुदाय चैत्यभूमीवर येत असतो. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, ऑनलाईन अभिवादन करण्यासाठी आणि चैत्यभूमीवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी काही लिंक्सही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी लिंक्स:

bit.ly/abhivadan2020yt

http://bit.ly/abhivadan2020fb

http://bit.ly/abhivadan2020tt

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com