ऑनलाईन वर्ग सुरू असताना अचानक झाला पॉर्न व्हिडिओ सुरू

मागच्या काही दिवसांतली तिसरी घटना
file photo
file photo

पुणे |प्रतिनिधी| Pune

शाळेचे ऑनलाईन वर्ग (School Online Class) सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ (Porn videos) सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये (Pimpri Chinchwad) घडला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. शाळांचे ऑनलाईन वर्ग (Online Class) सुरू असताना मध्येच पॉर्न (Porn videos) सुरू झाल्याची ही मागच्या काही दिवसांतली तिसरी घटना आहे. याबाबत पिंपरीतल्या तीन नामांकित शाळांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे तक्रार (Complaint to Pimpri Chinchwad Cyber ​​Cell) नोंदवली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे शाळांपुढे ऑनलाईन शिक्षण सुरक्षित ठेवण्याचं आव्हान (The challenge for schools is to secure online education) निर्माण झालं आहे.

करोनाच्या (Covid 19) प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीपासून राज्यातल्या शाळा बंद (State School Close) आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण (Education) देण्यासाठी ऑनलाईन वर्गांचा (online Class) पर्याय समोर आला. मागचं वर्षभर विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेत आहेत. पण हे ऑनलाईन शिक्षण किती सुरक्षित आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरीतल्या (Pimpri Chinchwad) नामांकित शाळेचा ऑनलाईन वर्ग सुरू होता. या वर्गात बाहेरील एक अज्ञात व्यक्ती सहभागी झाली. त्या व्यक्तीने वर्ग सुरू असताना त्यात पॉर्न व्हिडीओ सुरू केला. त्यामुळे शिक्षकांना (teachers) ऑनलाईन क्लास बंद (Online Class Close) करावा लागला. पिंपरीतल्या तीन शाळांच्या बाबतीत अशीच घटना घडली. त्यानंतर शाळेने संबंधित व्यक्तीविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com