विठ्ठल मंदिर खुले न केल्यास एक लाख वारकरी करणार आंदोलन
महाराष्ट्र

विठ्ठल मंदिर खुले न केल्यास एक लाख वारकरी करणार आंदोलन

प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पंढरपूर |pandharpur -

टाळेबंदीमुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले पंढरपूरातील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करा, अन्यथा येत्या 31 ऑगस्टला एक लाख वारकर्‍यांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वारकरी संप्रदाय आंदोलन करणार आहे. सध्या पंढरपूरात दोन हजाराहून अधिक करोना रुग्ण आहेत.

विठ्ठल मंदिर पुन्हा सुरू करा, या मागणीवरून वारकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आपली ही मागणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी वारकर्‍यांनी शिवसेना, भाजप नव्हे तर थेट वंचितचा पाठिंबा घेतला आहे. यासंदर्भात 24 ऑगस्टला जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकार्‍यांसोबत बैठक झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. परंतु या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी वारकरी संप्रदायाची आहे.

दरम्यान, टाळेबंदीमुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुनःश्च हरी ओम असा नारा देत टाळेबंदी हळूहळू उठवत असल्याचे सांगितले. मात्र आता पाच महिने होत आले तरीही राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com