Accident News : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या बसला अपघात; एकाचा मृत्यू, १५ हून अधिक जखमी

Accident
Accident

मुंबई | Mumbai

मुंबईहून कोकणात (Mumbai to Konkan) जाणाऱ्या गणेशभक्तांच्या एसटी बसचा (ST Bus) मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) माणगावनजीक रेपोली येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (A Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे. एसटी बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू (Death) तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत...

Accident
Accident News : पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; तीन ठार, चार जण गंभीर जखमी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पोलीस ठाणे (Goregaon Police Station) हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर रिपोली गावाच्या दिशेने जाणारी एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २६६४ ने ट्रक क्रमांक ४६ बीबी ५९४८ याला मागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचा काही भाग कापला गेला असून एसटीमधील १५ हून अधिक प्रवाशी जखमी (Injured) झाल्याचे बोलले जात आहे. तसेच या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

Accident
PM Narendra Modi Birthday : लहानपणीचे कष्टाळू, गुजरातचे मुख्यमंत्री ते जगातील प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदी

दरम्यान, जखमी प्रवाशांना माणगाव (Mangaon) येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी (Traffic police) तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य केले. तर अपघातानंतर काहीवेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Accident
New Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com