बर्‍हाणपूरात एक कोटींचे ब्राऊन शुगर जप्त

बर्‍हाणपूरात एक कोटींचे ब्राऊन शुगर जप्त

बर्‍हाणपूर - Bharahanpur - प्रतिनिधी : संजय यावलकर

येथील लालबाग पोलिसांनी एक कोटी रुपये किंमतीचेे सुमारे सव्वा दोन किलो ब्राऊन शुगर जप्त करत चार जणांना अटक केली आहे.

पोलीसांनी अंमली पदार्थ कायद्यातंर्गत गुन्हा दाखळ केला असून अन्य संशयितांचाा शोध सुरु आहे. बर्‍हाणपूर येथे मिळालेल्या ब्राऊन शुगरचा धागा मुंबईंपर्यंत जोडले जाण्याची शाक्यता सूत्रांनी वर्तविली.

जिल्हा पोलीस अधीक्षक राहुलकुमार लोढा यांनी सांगितले, की पोलीसांनी मोहम्मद बलील, सोहेल कॉटनवाला, मोहम्मद इमरान आणि वसीम नामक युवकाला अटक केली आहे. तसेच पोलीसांनी अन्य तरुणांची देखील चौकशी केली आहे.

संशयितांचे लागेबांधे मुंबई व इंदौरपर्यंत असण्याची शक्यता आहे. मुंबईहूनच ब्राउन शुगर बर्‍हाणपूरात आल्याची शक्यता आहे. तसेच संशयितांकडून बर्‍हाणपूरात कोण-कोण ब्राउन शुगर खरेदी करीत होते? याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com