ह्रदयद्रावक! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ह्रदयद्रावक! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मुंबई | Mumbai

पंढरपूर (Pandharpur) येथे काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या थैमानाने शेतकरी हवालदील झाला आहे. अशात हा अवकाळी पाऊस (Unsual Rain) आता एका चिमुकलीच्या जिवावरही उठला आहे.

पंढरपुरातल्या सांगोलामध्ये (Sangola) वावटळीत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. झोळी उडाल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला असून जवळा येथील लेंडी ओढ्यातील दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास जवळा येथील लेंडी ओढ्यात ही दुर्घटना घडली आहे. कस्तुरा साधू चव्हाण असे मृत मुलीचे नाव असून या घटनेनंतर कुटुंबार शोककळा पसरली आहे.

ह्रदयद्रावक! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?

दरम्यान, सोनंद इथं राहणारे साधू अण्णा चव्हाण हे पत्नी आणि चिमुकल्या कस्तुराला सोबत घेऊन जवळा इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. उपचार झाल्यानंतर पती-पत्नी, मुलगी मिळून आजोबांच्या पालावर आले होते. चिमुकलीचे आजोबा रमेश भीमा निंबाळकर हे जवळा घरेडी रस्त्यावर लेंडी ओढ्याच्या पटांगणात राहतात.

ह्रदयद्रावक! वावटळीत झोळी उडाल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Rain Alert : बळीराजा चिंतातूर! पुन्हा थैमान घालणार अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

दरम्यान, बाहेर उन्हाचा तडाखा असल्यानं सगळेच पालात विश्रांती घेत होते. यावेळी, मुलगी कस्तुरा पालातच झोळीमध्ये झोपली होती. तेव्हा दुपारी अडीचच्या सुमारास अचानक वावटळ सुटली. यात पालासह झोळी उंच हवेत उडाली असता झोळी उडून दगडावर आपटली यात कस्तुरीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com